देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या शाखांमध्ये अनेकदा योग्यप्रकारे काम सुरु नसल्याच्या घटना समोर आल...
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या शाखांमध्ये अनेकदा योग्यप्रकारे काम सुरु नसल्याच्या घटना समोर आल्या आहेत. ग्राहक अनेकदा याबाबत तक्रारीही करतात. मात्र, या सगळ्यावर चर्चा आणि थट्टेपलीकडे फारसे काही घडत नसल्याचे दिसून येते.
मात्र, SBI बँकेने आपल्या कामुचकार कर्मचाऱ्यांना चाप लावण्यासाठी महत्वाचे पाऊल उचलले आहे. त्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या संकेतस्थळावर संबंधित कर्मचाऱ्याविरोधात तक्रार करण्याची सोय उपलब्ध करुन दिली आहे. त्यामुळे आता बँकेचे ग्राहक कोणत्याही कर्मचाऱ्याने योग्य वागणूक किंवा सहकार्य न केल्यास एसबीआयच्या पोर्टलवर तक्रार नोंदवू शकतात.
बँकेच्या कर्मचाऱ्याची तक्रार करण्यासाठी खालील दिलेल्या संबंधित वेबसाईटवर जाऊन तक्रार नोंदवता येईल. संकेतस्थळावर गेल्यानंतर General Banking पर्याय क्लिक करावा, त्यानंतर Branch Related पर्याय निवडावा. त्यामध्ये तुम्ही आपली तक्रार नमूद करु करून आपला तक्रार क्रमांक नोंद करून ठेवावा.
No comments